पनवेल : महाड शहर परिसरामध्ये 22 जुलैला जोरदार अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसार वाहून गेले, अनेकांची दुकाने उध्वस्त झाली, पूरग्रस्तांना जीवनाश्यक मदतीसाठी सर्वत्र आवाहन होत आहे. या संकटकाळत महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महानगरपालिकेने मदतीचा हात देऊ केला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानूसार घनकचरा व आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, वाहन विभाग यांच्यावतीने तातडीने मदत पोहचविण्यात आली.
घनकचरा व आरोग्य विभागातर्फे चालकासहित दोन जेसीबी, दोन पाण्याचे टँकर, तीन टन कचरा उचलू शकणारे चार टिपर, दोन फॉगींग मशिन्स, फवारणीसाठी 500 किलो जंतूनाशक केमिकल्स, याचबरोबर 1 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 50 स्वच्छता कर्मचारी व 5 पर्यवेक्षक यांचे विशेष पथक पाठविण्यात आले आहेत. तसेच 10 हजार पाण्याच्या बाटल्या, 6 हजार बिस्कीट पुडे पाठविण्यात आले आहे आहेत. अग्निशमन विभागातर्फे एक फायर फायटर गाडी चार कर्मचाऱ्यांसहित तातडीने महाडला पाठविण्यात आले आहेत.





