पनवेल : पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाड चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करण्यात आली. कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख ,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस तथा रायगड जिल्हा प्रवक्ता प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या उपस्थतीतीत रवाना करण्यात आले. यावेळी युवा नेते तुषार पाटील, युवक कार्याध्यक्ष शहाबाज पटेल, रणजित नरुटे, प्रभाकर फडके,किशोर साळुंखे,राकेश थोरात,संतोष शेट्टी,खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके,राजूभाई नलवडे,चांदभाई शेख,मंगेश नेरुळकर, इम्रान सुभेदार,हर्षद बडे यांसह बहुसंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवकच्या वतीने महाड, चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत रवाना !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




