Press "Enter" to skip to content

शिवसेनेच्या वतीने खारघर येथे महारक्तदान शिबिर संपन्न ! जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा पुढाकार !

  • पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले उदघाटन !
  • ५०० रक्त बॉटल्स संकलित करण्याचा संकल्प !
  • रक्तदान अभियानाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने आणि पल्लवी रक्तपेढीच्या सहकार्याने खारघर येथे रविवारी महारक्तदान शिबिर संपन्न झाले. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रायगड उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उदघाटन संपन्न झाले.

सध्याच्या कोरोंना काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसंपर्क अभियानाअंतर्गत रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने खारघर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिली.

यावेळी रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, रायगड जिल्हा संघटक रमेश गुडेकर, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, खारघर शहर प्रमुख शंकरशेठ ठाकुर, सदानंद शिर्के, डी.एन. मिश्रा, अचूत मनोरे, राकेश गोवारी, प्रवीण जाधव, युवसेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, नितिन पाटील, पराग मोहिते,महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका कल्पना पाटील, रेवती सकपाळ, शुभांगी शेलार, सुजाता कदम, मंदा जंगले, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »