Press "Enter" to skip to content

शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे खारघरमध्ये महारक्तदान शिबिर : जिल्हाप्रमुख शिरीष घरत !

शिवसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन : जिल्हाप्रमुख शिरीष घरत !

पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसंपर्क अभियाना अंतर्गत खारघर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या कोरोंना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल रायगड आयोजित भव्य रक्तदान शिबिर* शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे नियोजन करण्यात आले आहे.
शिवसेना पनवेल विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा सल्लागार, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुका प्रमुख, तालुका संघटक, विधानसभा संघटक, महानगरप्रमुख, महानगर संघटक, उपतालुका प्रमुख, विधानसभा समन्वयक, महानगर समन्वयक, तालुका संपर्क प्रमुख, उपमहानगर प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, तसेच महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका, उपजिल्हा संघटिका, विधानसभा संघटिका, तालुका संपर्क संघटिका, तालुका संघटिका, महानगर संघटिका, उपतालुका संघटिका, उपमहानगर संघटिका, शहर संघटिका, व सर्व महिला पदाधिकारी,युवासेनेचे जिल्हा अधिकारी, उपजिल्हा अधिकारी, जिल्हा समन्वयक, विधानसभा अधिकारी, तसेच सर्व युवा अधिकारी,व युवतीसेनेचे जिल्हाअधिकारी, उपजिल्हा अधिकारी, विधानसभा अधिकारी, उपविधानसभा अधिकारी, शहर अधिकारी व सर्व पदाधिकारी तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले आहे.

यावेळी खासदार मावळ लोकसभा
श्रीरंग बारणे उपस्थितीत राहणार असून पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या शुभहस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात येणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बेलपाडा खारघर येथे
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिली.

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »