नवी मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर आंग्रे आणि दिघा तालुका महिला अध्यक्षा गौरी किशोर आंग्रे यांच्या पुढाकाराने तसेच बेबी शुअर फेर्टीलिटी सेंटरच्या सहकार्याने नवी मुंबईत मोफत मातृत्व शिबिर संपन्न झाले.
नवी मुंबईतील दिघा येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा १५ जोडप्यांनी आणि ३ महिलांनी मोफत लाभ घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नवी मुंबई उपाध्यक्षा पुनमताई कदम, ऐरोली विधानसभा अध्यक्षा जयश्रीताई हंकारे आदी उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवी मुंबई अध्यक्ष किशोर आंग्रे यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या वतीने नवी मुंबईत मोफत मातृत्व शिबिर संपन्न !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




