प्रतिनिधी, नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे युवा नेतृत्व किशोर ऊर्फ अनु आंग्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली। आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते किशोर आंग्रे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकाचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
किशोर आंग्रे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय युवा नेतृत्व आहे. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून किशोर आंग्रे यांनी विविध सामाजिक कार्यक्रम राबविले. कोरोना काळात अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. नवी मुंबईत युवकांचे मोठे संघटन उभे केले. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादीने नवी मुंबई युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.





