नवी मुंबई : साथरोग नियमांचे उल्लंघन करून कोविड काळात बेकायदापणे जिम चालविणाऱ्यां जिम मालकांना पनवेल महानगरपालिका प्रशासनाने छाप लावला आहे. खारघर येथील अशा जिमवर आज कारवाई करीत पालिकेने जिमना सील केले.
खारघर सेक्टर ३४ बी येथील सुपरला आज पालिकेने टाळे ठोकले. सदर जिममध्ये कोविड बाबतचे शासनाचे कोणतेही नियम पालन न करता जिम चालवली जात होती. जिममध्ये वेळोवेळी सॅनिटाइज केले जात नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या होत्या.जिममध्ये कोणी मास्कचा वापर करत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिकेने सुपर जिमला सील केल्याची माहिती विभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी दिली.
खारघरमधील अनेक जिम मालकांकडून पालिकेने ठरवून दिलेल्या ४ वाजेपर्यंतच्या वेळेचा नियम भंग केला जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. कोविड संसर्ग रोखण्यासाठी जिमना शनिवारी व रविवारी परवानगी दिलेली नाही. मात्र, अनेक जिम तर मनमानी करीत शनिवारी आणि रविवारी देखील सुरु ठेवत असल्याच्या तक्रारी आहेत. जिम चालकांच्या अशा बेजबाबदारपणामुळे कोविड संसर्ग वाढण्याची भीती आहे. जिम मालकांनीं व चालकांनी कोविड नियमांचे कठोरपणे पालन करावे, जिमद्वारे नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जितेंद्र मढवी यांनी स्पष्ट केले आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन ! खारघर मधील सुपर जिमला पालिकेने केले सील !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम






