नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल, नवी मुंबईची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी मंत्री व नवीमुबंई प्रभारी शशिकांत शिंदेसाहेब, ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे साहेब, तसेच अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, कोकण ओबीसी नेते राजा राजपुरकर, ओबीसी सेलचे नवी मुंबई अध्यक्ष रुपेश ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मंडल आयोगाच्या शिफारशी व्हीपी सिंग सरकारने लागू केल्या होत्या. त्यावेळी भाजप सरकारने जाळपोळ करुन मंडल आयोगाला विरोध केला होता. तसेच केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा राज्य सरकारला दिला नाही, तसेच जातीनिहाय जनगणना न केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. याच विषयाच्या संदर्भात नवी मुंबई मधील कार्यकर्त्यांसोबत या विषयावर मंथन करण्यात आले.





