नवी मुंबई : सिवुड्स-दारावे प्रभाग क्रमांक ९२ मधील रस्त्यांवर आलेली धोकादायक झाडांची छाटणी मोहीम राबविण्यात आली. स्थानिक नगरसेवक सुनील पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्य करण्यात आले.
सिवुड्स-दारावे प्रभाग क्रमांक ९२ येथील नेरूळ पोलिस स्टेशन ते दारावे स्मशानभूमी या परिसरातील वाढलेल्या झाडांमुळे रस्त्यात झाड रस्त्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर बाब लक्षात येताच स्थानिक नगरसेवक सुनील पाटील यांनी सदर झाडांची झाडांची छाटणी करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाला कळविले. याबाबत लेखी पात्र देऊन रस्त्यावर धोकादायक ठरलेली झाडे तोडावीत अशी मागणी केली. सिवुड्स-दारावे प्रभाग क्रमांक ९२ मधील रस्त्यावर आलेली झाडांची छाटणी स्वतः उभे राहून करून घेतली.





