नवी मुंबई : नमो नमो मोर्चा भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर के दिवाकर यांची रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नमो नमो मोर्चा भारतच्या वतीने आज खारघर येथे विशेष सन्मान करण्यात आला. नमो नमो मोर्चा भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह यांच्या शुभहस्ते खारघर येथे एका विशेष कार्यक्रमात आर के दिवाकर यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी नमो नमो मोर्चा भारत राष्ट्रीय प्रवक्ता मनोज मिश्रा, नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा संतोष शर्मा, नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सुशील जोशी, पालघर जिल्हा उपाध्यक्ष देवेन्द्र सिंह, रायगड जिलाध्यक्ष महिला मोर्चा नमो नमो मोर्चा नीता माळी, कामोठे शहर अध्यक्ष प्रवीण मालवीया, नीलम विसपुते, भरत पटेल, नवीन भट्ट आदी उपस्थित होते.
नमो नमो मोर्चा भारत संघटनेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्याचे कार्य आम्ही करीत आहोत. एकसंघ भारत बनविण्याचे नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघटना कार्यरत असल्याचे नमो नमो मोर्चा भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह यांनी यावेळी नमूद केले. नमो नमो भारताच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि विशेषतः रायगड जिल्ह्यात आर के दिवाकर यांनी संघटना बांधणीचे मोठे कार्य सुरु केले असल्याचे देखील सिंह यांनी नमूद केले. राज्यामध्ये रेल्वेच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची पेअतिक्रिया यावेळी आर के दिवाकर यांनी व्यक्त केली. तर महाराष्ट्रात उत्तरभारतीय समाजाबरोबर माझ्या महाराष्ट्रातील जनतेला सोबत घेऊन एकत्र काम करीत असल्याचे संतोष शर्मा यांनी सांगितले. यावेळी नमो नमो मोर्चा भारत राष्ट्रीय प्रवक्ता मनोज मिश्रा यांनी देखील दिवाकर यांना शुभेच्छा दिल्या .







