Press "Enter" to skip to content

“शुश्रूषा सुपरस्पेशालिटी” रायगडकरांचं हॉस्पिटल !

कोकण दर्पण ! कोकण LIVE

संजना महाडिक ! पनवेल : संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय तारळेकर यांनी पनवेल महानगरात रायगडकरांच्या हक्काचे हॉस्पिटल अर्थात  शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेले शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे पनवेल, उरणसह आणि संपूर्ण रायगडकरांच्या आरोग्यासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय तारळेकर आणि डॉ अनिता तारळेकर हे डॉक्टर दाम्पत्य `शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक व वैद्यकीय संचालक आहेत. डॉ. संजय तारळेकर आणि डॉ अनिता तारळेकर हे मागील ३० वर्षांपासून नेरुळ, नवी मुंबई येथील शुश्रूषा हार्टकेअर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात पहिली हार्टसर्जरी करण्याचा मान मिळविला तो जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय तारळेकर, डॉ अनिता तारळेकर आणि त्यांच्या शुश्रूषा हार्टकेअर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलने. नेरुळ पश्चिम , नवी मुंबई येथे अगदी पामबीज महामार्गावर डॉ. संजय तारळेकर यांनी २००२ साली अत्याधुनिक वैद्यकीय सुविधायुक्त असे शुश्रूषा हार्टकेअर अँड स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले. हृदयशस्त्रक्रिया, एनजीओग्राफी, अँजिओप्लास्टी, एक्सरे, रक्ततपासणी, सिटी स्कॅन, डायलेसिस, ऑक्सिजन व्यवस्था अशा अत्याधुनिकयुक्त वैद्यकीय सुविधांनी हॉस्पिटल सुसज्ज केले. नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी हि मोठी पर्वणी होती. नवी मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्याच्या उत्तम सुविधा याद्वारे डॉ संजय तारळेकर यांनी उपलब्ध करून दिल्या. नेरुळ सेक्टर ६ येथे सुसज्ज हॉस्पिटल सुरु करण्यापूर्वी डॉ संजय तारळेकर आणि डॉ अनिता तारळेकर यांनी नेरुळ सेक्टर ११ मधील लहानशा हॉस्पिटलमधून नागरिकांची सेवा केली.

वैद्यकीय क्षेत्रातील ३० पेक्षा अधिक वर्षांचा प्रगल्भ अनुभव घेऊन डॉ. संजय तारळेकर यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नवी मुंबईत सुसज्ज हॉस्पिटल सुरु करून ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात डॉ संजय तारळेकर यांनी शासनाच्या  महात्मा फुले आरोग्य योजना आणि  राजीव गांधी आरोग्य योजनांसारख्या योजना पोचविल्या. मोफत वैद्यकीय शिबिरे घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.  मात्र, रायगड जिल्ह्यात शेवटच्या टोकापर्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सिविधा पोहचल्या पाहिजेत, यासाठी डॉ संजय तारळेकर यांनी रायगड जिल्ह्यातच आपले पाऊल टाकले आहे. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महानगर असलेल्या पनवेल शहरात सुसज्ज असे हॉस्पिटल सुरु केले आहे. जुने पोस्ट ऑफिस पनवेल येथे सुसज्ज उभ्या असलेल्या इमारतीत शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. १०० बेडची क्षमता असलेले हे हॉस्पिटल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज आहे. ओपीडीपासून ते क्रिटीकेअर पर्यंतच्या येथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. जनरल वॉर्ड, आयसीयू आणि क्रिटीकेअर विभाग आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची मोठी फौज सज्ज आहे. एक्सरे पासून रक्ततपासणीची सुविधा आहे. सध्या कोविडचा काळ असल्याने संपूर्ण हॉस्पिटल ऑक्सिजनयुक्त करण्यात आले आहे. क्रिटीकेअर आयसीयू पासून जनरल वॉर्डमधील बेडसाठी देखील ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  

पनवेल महानगपालिका, पनवेल तालुका, उरण तालुका आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांना उत्तोमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व आरोग्य योजना रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहचविणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. संजय तारळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. 

डॉ संजय तारळेकर आणि डॉ अनिता तारळेकर
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »