पनवेल : सध्या कोरोना महामारीने सर्व जगाचेच अर्थकारण हतबल झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना रोजगार असले तर पगार कमी येत आहेत. त्यातच घर चालविणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत पनवेल येथील डीएव्ही शाळेने शालेय फीज भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावल्याने सोमवारी एमआयएम विद्यार्थी आघाडीने आंदोलन केले.
फीवरून पालक व शालेय व्यवस्थापनात संवादाचा अभाव आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर डीएव्ही शाळेने विद्यार्थ्यांकडे फी साठी तगादा लावला, याचा जाब विचारण्यासाठी एमआयएम विद्यार्थी संघटनेच्या वतीने आणि याबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला बोलावून भेट नाकारल्यामुळे एमआयएमचे पदाधिकारी संतप्त झाले. चर्चेला बोलावून भेट नाकारणाऱ्या शाळा प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
एमआयएमचे विद्यार्थी संगटनेचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान, महाराष्ट्र प्रवक्ता रविश मोमीन, रोशन शेख, विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष वैभव महाडिक, सरस्वती मेमाणे, योगेश पवार, हेमांगी चोपडे आदींसह पालक उपस्थित होते.





