Press "Enter" to skip to content

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सिवुड्स-दारावे येथे गरजूंना अन्नधान्य वाटप ! रणजित नाईक यांचा पुढाकार !

नवी मुंबई : भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण नवी मुंबईत सुरु असलेली गरजूंना अन्नधान्य वाटप मोहीम मंगळवारी सिवुड्स-दारावे प्रभाग क्रमांक ९९ मध्ये राबविण्यात आली. भाजप नवी मुंबई युवा मोर्चा सरचिटणीस रणजित नाईक आणि समाजसेविका प्रणिता रणजित नाईक यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला.

सिवुड्स-दारावे मध्ये मोठ्या प्रमाणात गरीब, गरजू व अल्प-उत्पन्न गटातील लोकवस्ती आहे. कोरोनाच्या काळात सर्वांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. मात्र, गरीब व गरजूंना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले. कोरोनाने समाजात उपासमारी आणली. एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला. अशा संकटात लोकनेते तथा आमदार गणेश नाईक देवदूत म्हणून गरीब – गरजूंच्या मदतीला धावून आले. संपूर्ण नवी मुंबईत प्रत्येक प्रभागात त्यांनी नागरींना अन्नधान्य वाटप केले. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिवुड्स-दारावे प्रभाग क्रमांक ९९ मध्ये भाजप नवी मुंबई युवा मोर्चा सरचिटणीस रणजित नाईक आणि समाजसेविका प्रणिता रणजित नाईक यांनी अन्नधान्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य पुरविले म्हणून रणजित नाईक आणि प्रणिता नाईक यांनी लोकनेते गणेश नाईक यांचे आभार मानले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »