Press "Enter" to skip to content

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ ! राष्ट्रवादीच्या वतीने नवी मुंबईत मोदी सरकारचा निषेध !

नवी मुंबई : केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या मुद्यावर केंद्रात 2014 साली सत्ता मिळवली, मात्र सात वर्षात हेच दर दुप्पट करून देशाची पूर्णतः फसवणूक केली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी आज हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वाशी येथे आयोजित केलेल्या आंदोलनात मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील साहेब सुचनेनुसार पेट्रोल- डिझेल व गॅस दरवाढ विरोधात भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकशेठ गावडे व प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, नवी मुंबई कार्याध्यक्ष जी एस पाटील, महिला जिल्हाध्यक्ता प्राजक्ता मोंडकर, कार्याध्यक्ष सुनिता देशमुख, वरिष्ठ उपाध्यक्ष उज्वला ढोले, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेवक वैभव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल घोगरे, जिल्हा सचिव अशोक सुर्यवंशी, बेलापूर विधानसभा कार्याध्यक्ष प्रविण लोकरे, वाशी तालुका अध्यक्ष सतनाम नागपाल, प्रवक्ता राजू देशमुख, बेलापूर विधानसभा अध्यक्षा निर्मला वायकर, महिला सरचिटणीस निर्मला लटांबळे, सौ.विजया कदम, सौ सुनिता हुले, आशा डुमरे, व सर्व फ्रंट सेलचे अध्यक्ष, अनेक युवक, युवती, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »