पनवेल : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पनवेल शहराचे जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी खांदा काॕलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घरगुती गॕस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या दरवाढी धोरणाविरोधात कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त करत घोषबाजी केली.
यानंतर या दरवाढी विरोधात पनवेलचे तहसिलदार व पनवेलचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सुनिल नाईक, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सचिव संजय परब, डॉक्टर सेलचे प्रभाग अध्यक्ष डॉ.जयदेव काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा सचिव सुहास बनसोडे, जिल्हा सचिव गोविंद मोरे, प्रभाग अध्यक्ष सचिन पांचाळ, विकास गौड,अमर ढगे,धनाजी चव्हाण, अशोक हजारे तसेचखांदा काॕलनीतील महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

घरगुती गॅस दरवाढ करून भाजप जनतेची फसवणूक करतेय ! राष्ट्रवादीचा हल्लाबोल !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




