नवी मुंबई : स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅस दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पनवेलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजप प्रणित सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, फारुख पटेल राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग यांच्या नेतृत्वाखाली तळोजा मध्ये घरघुती गॅस,पेट्रोल व डिझेल यांच्या वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे तळोजा पेट्रोल पंपा मध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नियमाचे पालन करून आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्यांच्या स्वयंपाकासाठी आवश्यक घरगुती गॅस सिलिंडरची किंमत भाजपप्रणीत केंद्र सरकारने २५ रुपयांनी वाढवली. सततच्या इंधन दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. पक्षातर्फे आज प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन छेडले जाणार आहे. घरगुती गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आज रस्त्यावर उतरत आहेत. तळोजा पेट्रोल पंपामधील सर्व परिसरात घरघुती गॅस व इंधनदरवाढी मुळे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी अजिनाथ महादेव सावंत
जिल्हा उपाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस,रमेश नाडकर पनवेल जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, प्रमोद बागल अध्यक्ष पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस , शहबाज पटेल कार्याध्यक्ष पनवेल शहर जिल्हा,रणजित नरुटे,चाँद शेख,तसेच महिला राष्ट्रवादी पनवेल जिल्हा सचिव नेहा पाटील,चेतना धुरी,सोनाली पालव, फैझल खान,इम्रान सुबेदार, निसार पटेल शहजाद पटेल,ओसामा रब्बानी,सलीम पटेल,अब्बास भाई,समीर भाई,फिरोज शेख,साकीब पटेल,विशाल घाडगे, अमीर भाई,वसीम बावदीन, उमर मुल्ला जुबेर भाई व राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महागाईने जनतेचे कंबरडे मोडले ! भाजपप्रणित केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला ! राष्ट्रवादी आक्रमक !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




