Press "Enter" to skip to content

घरगुती गॅस दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन ! मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी !

पनवेल : स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅस दरवाढीविरोधातआज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहराच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बेचारी जनता करे पुकार, लूट रही है मोदी सरकार तसेच कोरोनाने वाचलो, पण गॅस दरवाढीने मेलो, अशा घोषणा देत
केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरदास गोवारी,पनवेल शहर जिल्हा व नगरसेवक अध्यक्ष सतीश पाटील, कार्यध्यक्ष डॉ शिवदास कांबळे,महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर,पनवेल यांच्या मार्गदर्शना खाली पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी.ए. पाटील, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रामदास नारकर, जिल्हा उपाध्यक्ष आर .एन. यादव,ओबीसी सेल जिल्हा कार्यध्यक्ष राजू मुल्लानी, पनवेल शहर जिल्हा सहसचिव बबनराव पवार, जेष्ठ नागरिक सेल भाऊसाहेब लबड़े यांच्या उपस्थिति खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके, खारघर महिला सेल शहर अध्यक्षा राजश्री कदम, खारघर ओबीसी सेल अध्यक्षश्री नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज खारघरमध्ये आंदोलन करण्यात आले.
सतत गॅस दर वाढ होत आसल्याने जनतेचा अक्रोश आज रस्त्यावर दिसला. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकासाठी आवश्यक घरगुती गॅस सिलिंडरची किंमत भाजप प्रणीत केंद्र सरकारने २५ रुपयांनी वाढवली. सततच्या इंधन दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. पक्षातर्फे आज इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिल्पचौक खारघर येथे आंदोलन केले व दरवाढीचा निषेध केला.
त्या प्रसंगी मनोहर सत्रे, निखिल कोईघाड़े, महेश राऊत ,गणेश देशमुख, अरविंद सावंत, सतीश अवघडे,ओमकार भोसले, तुकाराम भगत चाँद शेख,आशिफ पटेल,महेश शिंदे, संगीता सुर्वे, रेखा भागवत, विजया मोहीते, सुनिता पेटकर, मृणाल कदम, सावित्री सुतार, रेणुका पगारे, पार्बती पाडर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »