नवी मुंबई : आय एस टि डी नवी मुंबईने एकदिवसीय व्यवस्थापण करिअर या विषयावर ३० जून २०२१ रोजी वेबिनार आयोजित केला होता. वेबिनारचे उदघाटन जयश्री काटकर, अध्यक्ष,आय एस टि डी नवी मुंबई यांनी करून वेबिनारला शुभेच्छा दिल्या.नील रमेश, कोषाध्यक्ष,ह्यांनी आय एस टि डी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास डॉ. राहुल कांबळे, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, काशीपूर चे प्राध्यापक वक्ता म्हणून लाभले. डॉ राहुल सरानी ह्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न समझून समाधान केले.
प्रा.अंशुल शर्मा, सचिव, आय एस टि डी, नवी मुंबई ह्यांनी आयोजकांचे आणि वक्त्यांचे आभार मानले.
प्रा. कुलदीप भालेराव, उपक्रम समन्वयक ह्यांनी करिअरच्या शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या उपक्रमास मार्गदर्शन केल्यांबद्दल कुरियन डॅनियल, राष्ट्रीय उपाध्यक्ष आय एस टि डी तसेच डॉ. डी. वाय. पाटील, नॅशनल कौन्सिल मेंबर ह्यांचे आभार मानले तसेच निधी ठाकूर, तन्वी जोशी, अमृता मोरे आयोजक सदस्याचे आभार व्यक्त केले.

आय एस टि डी नवी मुंबई आयोजित “व्यवस्थापण करिअर” वेबिनार संपन्न !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




