पनवेल: पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आले असून त्यांच्या जागी पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या नगरविकास विभागाकडून मंगळवारी (२९ जून) त्या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
मे २०२० मध्ये गणेश देशमुख यांची पनवेल महानगरपालिका आयुक्तपदावरून ठाणे येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा गणेश देशमुख पनवेल महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.





