नवी मुंबई : भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण नवी मुंबईत सुरु असलेली गरजूंना अन्नधान्य वाटप मोहीम रविवारी सीबीडी -बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मध्ये राबविण्यात आली. स्थानिक नगरसेविका सुरेखा नरबागे आणि समाजसेवक अशोक नरबागे यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला.
सीबीडी -बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचा परिसर आहे. गरीब, गरजू व अल्प-उत्पन्न गटातील लोकवस्ती आहे. कोरोनाच्या काळात सर्वांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. मात्र, गरीब व गरजूंना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले. कोरोनाने समाजात उपासमारी आणली. एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला. अशा संकटात लोकनेते तथा आमदार गणेश नाईक देवदूत म्हणून गरीब – गरजूंच्या मदतीला धावून आले. संपूर्ण नवी मुंबईत प्रत्येक प्रभागात त्यांनी नागरींना अन्नधान्य वाटप केले. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक १०३ मधील नगरसेविका सुरेखा नरबागे आणि समाजसेवक अशोक नरबागे विभागात अन्नधान्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य पुरविले म्हणून सुरेखा नरबागे आणि अशोक नरबागे यांनी लोकनेते गणेश नाईक यांचे आभार मानले.





