प्रतिनिधी, नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवबंधन बांधून खारघर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
खारघर स्वप्नपूर्ती सोसायटी खारघर सेक्टर-३६ येथील शेकडो पुरुषांनी व महिलांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्याप्रसंगी शिवसेना पक्षाबद्दल शिरीष घरत यांनी योग्य मार्गदर्शन करून तसेच नियुक्ती पत्र देवून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे , उपमहानगर प्रमुख दिपक घरत , पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, पनवेल महानगर समन्वयक गुरूंनाथ पाटील, पनवेल खारघर शहरप्रमुख शंकर ठाकुर, शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.





