नवी मुंबई : नवी मुंबई मनपा क्षेत्रातील सिवुड्स – दारावे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. सिवुड्स- दारावे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक सुनील पाटील यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली होती. पालिका आयुक्तांनी सदर मागणीला मान्यता देत २८ जून पासून कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्याला परवानगी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दारावे येथील गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयात सदर मोफत कोविड लसीकरण केंद्र २८ जून पासून सुरु होत आहे. सिवुड्स- दारावे विभागात मोठी लोकवस्ती आहे. अनेक कुटुंबे हि मध्यम व अल्प उत्पन्न गटातील आहेत. यामुळे खाजगी रुग्णालयात जाऊन कोविड लसीकरण करून घेणे त्यांना परवडणारे नाही. भविष्यात येणारी कोरोनाची संभाव्य लाट पाहता सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर कोविडची प्रतिबंधात्मक लस मिळणे आवश्यक आहे . त्याअनुषंगाने नगरसेवक सुनील पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे मागणी करून पाठपुरावा केला. २८ जूनपासून सदर लसीकरण केंद्र सुरु होत असून नागरिकांनी आपले लसीकरण करून कोरोनापासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे, असे आवाहन नगरसेवक सुनील पाटील यांनी केले आहे.

सिवुड्स- दारावे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु ! नगरसेवक सुनील पाटील यांच्या मागणीला यश !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम





