Press "Enter" to skip to content

महिलांना झाडे देऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसने साजरा केली वटपौर्णिमा !

पनवेल : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने खारघर शहरात आगळ्या-वेगळ्या पध्यतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. महिला झाडे देवुन महिलांची ओटी भरण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेस खारघर शहर अध्यक्षा राजश्री कदम यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहरजिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, प्रदेश सरचिटणीस व पनवेल निरिक्षक भावना घानेकर यांच्या उपस्थितीत होत्या. राष्ट्रवादी काॅग्रस महिला कमीटी खारघर यांच्या मार्फत वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाचे झाड तोडू नये तसेच कोरोना पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्र गर्दी करू नये, या संकल्पनेतून निसर्ग वाचवावा तसेच गर्दीही होऊ नये
म्हणुन राष्ट्रवादी महिला कमीटी कडुन वेगवेगळी १०० झाडांचे वाटप करण्यात आली. या उपक्रमातुन अनेक ठिकाणी झाडे लावण्यात आली. आज माणसांना ऑक्सिजनची गरज आहे यातुन वडाच्या झाडचे पुजन करुन तेच जमीनीत लाऊन त्याची जोपासना करायची ही या मागची कल्पना म्हणुन झाड देण्यात आली, अशी प्रतिक्रिया खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कायकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संगीता सुर्वे ,वैशाली जाधव,रेखा भागवत,माधवी ओंबळे,पुष्पलता जाधव ,ज्वोती मॅडम,कांचन शितेळे
मृणाल कदम ,सोनाली शिरोडे या महिलांनी झाडांचे वाटप केले

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »