पनवेल : युवाप्रेरणा सामाजिक संस्था, भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडल व सुमन्स ऐरोबीकस अँड योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल सेक्टर १९ ,खारघर येथे जागतिक योग दिनानिमित्त योगासने करत योग दिन साजरा करण्यात आला.
सदर प्रसंगी रघुनाथ ताटे (राधाजीवन दास) नित्यानंद गौरंग योग & वैल्यू एजुकेशन स्कूल यांनी उपस्थित सर्वांना योगासने शिकवत योगाचे महत्त्व सांगितले. सदर योग शिबिराचे आयोजन नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केले होते. शिबिराचे उदघाटन भाजपा खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील,सुमन हेगडे ,दिलीप जाधव यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आले. आजच्या या योग शिबिरात खारघर मधील आंतरराष्ट्रीय स्थरावरील टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने देखील उपस्थित राहत योगासनांचे धडे घेत योग शिबिरात आपला सहभाग नोंदवला. सदर योग शिबिरात भाजपा खारघर तळोजा मंडल सरचिटणीस दिपक शिंदे , भरत कोंढाळकर, मुकेश गर्ग, शोभा मिश्रा, निर्मला आळेकर, हे उपस्थित होते.

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वतीने योग दिन साजरा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




