Press "Enter" to skip to content

सिवुड्स – दारावे येथे लसीकरण केंद्र सुरु करा : रणजित नाईक यांची मागणी !

नवी मुंबई, प्रतिनिधी : सिवुड्स – दारावे येथील टिळक कॉलेजमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे नवी मुंबई सरचिटणीस रणजित नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई शहरात विभागानुसार लसीकरण करण्यात यावे, या करीता आमदार गणेश गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी सिवुड्स – दारावे येथे लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी रणजित नाईक यांनी केली. सिवुड्स – दारावे परिसरातील लोकवस्ती पाहता येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्याची गरज आहे. त्यामुळे येथील टिळक कॉलेजमध्ये येथील रहिवाशांच्या सोयीकरिता कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी रणजित नाईक यांनी आयुक्तांकडे केली. आयुक्त अभिजित बांगर यांनी सदर मागणी मेनी करीत सकारात्मकता दाखवली. समाजसेवक रणजित नाईक यांच्या मागणीनुसार येथील रहिवाशांच्या सोयीकरिता सिवुड्स येथील टिळक कॉलेजमध्ये कोविड लसीकरणाचे केंद्र नियोजित करण्यात आले आहे.सदर केंद्रात लवकरच लसीकरणास सुरुवात होणार आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »