Press "Enter" to skip to content

अति दिव्यांग व्यक्तींचे घरीच होणार कोविड लसीकरण !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना आता कोविड लसीकरणासाठी वेगळी रांग लावण्याची आवश्यकता नाही. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम आखली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी पालिका प्रशासनाकडे मागणी केली होती.

नवी मुंबई मनपा क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरणासाठी आठड्याच्या सातहि दिवस वेगळी रांग असावी, तसेच अति दिव्यांग व्यक्तींच्या घरी जावून कोविड लास द्यावी, यामागणीसाठी मल्लिकार्जुन पुजारी यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत चर्चा केली असता आयुक्तांनी सदर मागणी मेनी केली. त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरणात अडचण होणार नाही.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »