पनवेल : पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असल्याने इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल शहर जिल्ह्याच्या वतीने आज गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील व पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा जिल्हाअध्यक्ष सतीश पाटील व कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल शहर जिल्हा तर्फ़े इंधनदरवाढ कमी करण्यासाठी केंद्रसरकार विरोधात सकाळी १० वाजता भारत पेट्रोल पंपा मध्ये आंदोलन कऱण्यात आले. यावेळी पंपा मध्ये पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकास गुलाबाचं फुल देऊन थोडं हटके आंदोलन करण्यात आले. यावेळी कळंबोली पोलीस ठाण्यातील मोठा फौज फाटा ही उपस्थित होता. सदरील आंदोलन सोशल डिस्टन्स व सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल,कार्याध्यक्ष शहबाज पटेल, खारघरचे बळीराम नेटके,रणजित नरुटे, चाँद शेख,अमित पडवळ, राजू नलावडे,किशोर साळुंखे,सागर पाटील,फरहान गोलंदाज,हर्षल बडे,प्रणय परब,शैलेश लोढे व राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





