नवी मुंबई : राज्यातील पेट्रोल व डिझेल वाढ, शेती खताच्या दरात केलेली वाढ आणि महागाईच्या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवी मुंबईत आंदोलन करीत केंद्रातील भाजपप्रणित सरकारचा तीव्र निषेध केला.
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी नवी मुंबई ऐरोली मतदार संघाच्या वतीने ऐरोली येथील पेट्रोल पंपावर वाढती महागाई, वाढते पेट्रोल डिझेलचे दर, शेतकर्यांच्या खतावरील वाढीव दर या विषयी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव मल्लिकार्जून पूजारी, नवी मुंबई कार्याध्यक्ष जी एस पाटील, मागासवर्गीय सेल अध्यक्ष विजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल घोगरे, ऐरोली तालुका कार्याध्यक्ष नितीन पाटील, दिघा तालुका अध्यक्ष मिलींद जाधव, प्रशांत पारख, दत्तात्रेय भंडारी, मनोज वैती, दिपक पहूरकर, हर्षवर्धन गायकवाड, महिला अध्यक्षा कोपरखैरणे शितल वाघमारे, सौ. यल्लवा रसनभैरे, भूषण कासारे, मोफतलाल जाधव, रूषीकेश वानखडे, विश्वनाथ पाटील, राहूल सोनकांबळे, सचीन साळवे,, रिंकू यादव, तसेच अनेक कार्यकर्ते सोशल डिस्टिंगचे पालन करून उपस्थित होते.
कोकण दर्पण





