Press "Enter" to skip to content

तळोजा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत पालकमंत्र्यांनी आयुक्तांना निर्देश द्यावेत : प्रसाद ढगेपाटील !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा विभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना तात्कळ निर्देश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा सचिव प्रसाद ढगेपाटील यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.
पनवेल मनपाच्या वतीने काही ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. तळोजा जवळील खारघर नोड मध्ये लसीकरण सुरू आहे. टाटा हॉस्पिटल मध्ये देखील लसीकरण सुरु आहे. मात्र, सदर ठिकाणी येऊन लसीकरण करणे तळोजावासियांसाठी गैरसोयीचे आहे. तळोजा फेज 1, फेज 2 हे मोठे नोड आहेत. तळोजा  येथे कोविड बाबत कोणतीच सुविधा नाही. सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, तळोजा विभागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना येथे लसीकरण केंद्र सुरू केलेले नाही.  मर्यादित लसीकरण आणि नेहमीची गर्दी यामुळे तळोजामधील नागरिकांना येथे येऊन लसीकरणाला नंबर लावणे मुश्किल आहे. त्यामुळे तळोजा येथे लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी प्रसाद ढगेपाटील यांनी पालकमंत्री अदिती तटकरे व पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रसाद ढगेपाटील
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »