Press "Enter" to skip to content

लसीकरण मोहिमेत संजना कदम यांची जनसेवा ! आरोग्य केंद्राजवळ बेंचेसची व्यवस्था !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांनी जनसेवेचे व्रत जपत आपल्या नगरसेवक निधीतून नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था केली आहे.

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ०६ मधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र प्लॉट नंबर ३६ सेक्टर १५ येथे कोरोना कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम चालू आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी लोकांना बसण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ०६ च्या नगरसेविका संजना समीर कदम यांचा स्थानिक नगरसेवक निधीमधून याठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रभाग क्रमांक सहा मधील सेक्टर १५,१६,१७,१८ जवळपास पन्नास बेंचेस लावण्यात आले आहेत व याचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिकांना होत आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनी नगरसेविका संजना समीर कदम यांचे अभिनंदन केले व आभार मानले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »