नवी मुंबई : खारघर सेक्टर ११ मधील एच. सी. सी. लाईफ केअर लिमिटेड या भारत सरकारचा उपक्रम असलेल्या बिल्डींगचा सुरक्षा रक्षक सत्येंद्र मिश्रा हे झोपेत असताना त्यांच्या हाताच्या बोटाला सापाने कडाडून चावा घेतल्याची घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मिश्रा झोपेतून जागी झाले ,त्यांनी ताबडतोब त्यांचे दुसरे सुरक्षारक्षक गजाधर यादव यांना सर्पदंश झाला असल्याची माहिती दिली. गजाधर यादव यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेला संपर्क केला असता या संस्थेचे सर्पमित्र दिपक गायकवाड व श्रीकांत कोरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटणास्थळी धाव घेतली व अजु बाजुला शोध घेतला असता सदर ठिकाणी (चेकर्ड क्लिकबॅक) पाण दिवड या जातीचा साप अढळला सदर सापाला मोठ्या शिताफीने पकडले आपल्या बॅग मध्ये बंद केल्या नंतर सर्पमित्र दिपक गायकवाड व श्रीकांत कोरे यांनी ताबडतोब एम. जी. एम. रुग्णालय कामोठे येथे धाव घेतली व तेथील डॉक्टरांना सदर साप हा बिनविषारी असल्याची माहिती दिली त्या नंतर खारघर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक मा. अरुण पढार साहेब यांनी रूग्णालयात रूग्णाची व सर्पमित्र यांची विचारपूस केली व रुग्णाला धीर दिला व काळजी घेण्याचा सल्ला दिला.
एक दिवसांपुर्वीच सर्पमित्र दिपक गायकवाड व सर्पमित्र श्रीकांत कोरे यांनी एक घोणस व एका घुबडाला पकडुन जंगलात सोडून जिवदान दिले आहे सध्या उष्णता खुप वाढत असल्याने साप मनुष्य वस्ती मध्ये निघण्याचे प्रमाण वाढले आहे.
कुठेही साप, पक्षी, किंवा जखमी अवस्थेतील प्राणी अढळुन आल्यास ताबडतोब वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या मुक्या प्राण्यांच्या रक्षण व जतन करणार्या संस्थेशी संपर्क करा असे आवाहन सर्पमित्र दिपक गायकवाड यांनी केले





