Press "Enter" to skip to content

कोविड योध्यांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी युवक !

पनवेल : कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा कोविड योध्यानी आपल्या कार्य कर्त्यव्याची कमान हाती घेतली आहे. अशा योध्यांच्या सेवेसाठी पनवेल शहरजिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस पुढे सरसावली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून कोविड कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना व्हिटॅमिन सी व डी गोळया, ओ आर एस एनर्जी ड्रिंक, बिस्कीट व पाण्याचे वाटप करण्यात आले.

पार्थदादा पवार फाउंडेशनच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. आपल्या शहराची व शहरातील कोविड योध्याची काळजी घेणे हे फक्त आमचे कर्तव्य नसून काळजीपूर्वक जबाबदारी आहे. याचे भान राखून या महामारीमध्ये पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून व्हिटॅमिन सी आणि डी गोळया, ओ आर एस एनर्जी ड्रिंक,बिस्कीट बॉक्स,पाणी बॉटल बॉक्स,कळंबोली पोलीस स्टेशन, कामोठे,खारघर ट्राफिक पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.यावेळी युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल,कार्याध्यक्ष शहबाज पटेल,तुषार पाटील,रणजित नरुटे,प्रशांत रणवरे,विनोद पाटील,व कार्यकर्ते उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »