नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रेमडेसीवीर इंजेक्शनचा कला बाजार करणाऱ्या टोळीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक अटक केली आहे. समीर चांदोरकर असे आरोपीचे नाव आहे.
समीर चांदोरकर हा इसम कोपरखैरणे आणि नवी मुंबई परिसरात रेमडेसीवीर इंजेक्शन २० हजार रुपयांना विकत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण हांगे व प्रसाद घोरपडे यांना डमी कस्टमर म्हणून पाठवून समीर चांदोरकर राहणार डोंबिविली याला कोपरखैरणे सेक्टर १५ येथून सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ४ रेमडेसीवीर इंजेक्शन, एक ऍक्टिवा मोटार सायकल, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात वंदना जाधव व भिवसन उर्फ विनोद पाटील या डोंबिविली येथे राहणाऱ्या दोघांचा देखील समावेश असल्याने त्यांना देखील अटक करण्या आल्याची माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.





