Press "Enter" to skip to content

खाजगी सोसायटी अंर्गत कोरोना लसीकरणाला परवानगी द्यावी : नवी मुंबई शिवसेना !

नवी मुंबई : मोठी लोकवस्ती असलेल्या खाजगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खाजगी रुग्णालयांना कोरोना लसीकरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने यांनी आयुक्तांची भेट घेऊन याबाबत लेखी निवेदन दिले आहे.


केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सम्पूर्ण राज्यात १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु होणार आहे . या मोहिमेअंतर्गत १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सध्यस्थितीत फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देताना अनेक अडचणी येत असून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे मोठी लोकवस्ती असलेल्या सोसायट्यांना खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सोसायटी अंतर्गत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विजय माने यांनी यावेळी केली आहे. साधारणतः ज्या सोसायटीची लोकसंख्या १५०० ते २००० आहे , त्यांना शासनाच्या अतिशर्थी व नियमांचे पालन करून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची परवानगी द्यावी, यामुळे प्रशासनावरील ताण कमी होऊन लसीकरणाला देखील वेग मिळेल, असे विजय माने यांनी नमूद केले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »