नियंत्रण कक्षाद्वारे पनवेल मनपा
देणार बेड उपलब्धतेविषयी माहिती !
२४ तास हेल्पलाईन सुरु राहणार !
पनवेल : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयातील बेड उपलब्धतेसाठी महापालिकेने नियंत्रण कक्ष उभारले आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेटिंलेटर बेड उपलब्धतेविषयी माहिती सांगितली जाणार आहे. तसेच एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असल्यास संबधित व्यक्ती आणि रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क निर्माण करून देण्याचे काम हे नियंत्रण कक्ष करणार आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या ८० :२० धोरणांनूसार सर्व खाजगी कोव्हिड -१९ रुग्णालयांना ८० टक्के बेड महानगरपालिकांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे. हे नियंत्रण कक्षातील पथक या रुग्णांलयांवर लक्ष ठेवून असणार आहे. बेड उपलब्धतेसाठी रूग्णांलयांनी डॅश बोर्डवर माहिती अद्ययावत करण्यावरही हे पथक लक्ष ठेवणार आहे. बेड उपलब्धतेसाठी ८९२८९३१०३४ / ८९२८९३१०४९ या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच या ८९२८९३१०४१ / ८९२८९३१०५२ व्हॉटस् अॅप नंबरवर केवळ नागरिकांनी रुग्णांची माहिती (कागदपत्रे) नियंत्रण कक्षातील पथकास द्यावी. जेणे करून हे पथक संबधित रुग्णास मदत करू शकेल. एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असल्यास रुग्णांशी संबधित नातेवाईक आणि संबधित रूग्णालय यांच्यामध्ये संपर्क साधण्याचे काम हे नियंत्रण कक्ष करणार आहे.
प्रत्येक दिवशी सर्व कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना देऊन सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डिस्जार्च देऊन गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी हे पथक रुग्णांलयाना सूचना देणार आहे. रोजच्या रोज कोव्हिड रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबाबत रूग्णालयांकडून माहिती गोळा करून ती माहिती आरोग्य विभागाकडे देण्याचे काम हे पथक करणार आहे. महानगरपालिकेव्दारे चालविल्या जात असलेल्या किंवा कराराने उपलब्ध करून घेतलेल्या रुग्णालयात रूग्ण दाखल करण्याच्या प्रक्रियेवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचे काम हे नियंत्रण कक्ष करणार आहे. सदरचे पथक २४ तास काम करणार आहे. तीन वेगवेळी पथके सकाळी ८ .०० ते सायं. ४ .०० , सायं ४०० ते रात्री १२ .०० , रात्री १२ .०० ते सकाळी ८ .०० अशा तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहे. या तीन पाळ्यांमध्ये तीन डॉक्टरर्सही या पथकामध्ये असणार आहेत. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेव्दारे करण्यात आले आहे.
कोट :
महानगरपालिकेच्यावतीने २४ तास नागरिकांना माहिती देणारे नियंत्रण कक्ष चालू केले असून या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना कोणत्या रुग्णांलयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती मिळणार आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा !

पनवेल महानगरपालिका.





