पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या चिंतेची बाब होत आहे. याच पार्श्वभूमीवर काल (22 एप्रिल) खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या समवेत अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. पनवेल शहरातील कोरोना रुग्णांवर महापालिकेच्यावतीने नियंत्रण करण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी खा. श्री.बारणे यांनी घेतली. या बैठकीस परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सल्लागार बबन दादा पाटील उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज २००० -२५०० चाचण्या केल्या जात असून सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त मोफत टेस्ट उपलब्ध करून देण्याकरिता पनवेल महापालिका प्रयत्न करत असून एमजीएम व तेरणा मेडिकल कॉलेज यांच्यासोबत प्रत्येकी ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा केल्यामुळे पनवेलमधील नागरिकांना दररोज १३०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळणार असल्याची माहिती खासदार श्री. बारणे यांना दिली.

पनवेलकरांना दररोज १३०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत : खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




