Press "Enter" to skip to content

आयुक्त साहेब, कोविड रुग्णांची फरफट होतेय ! पनवेल मनपाची हेल्पलाईन सुरू करा !

पनवेल : पनवेल मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोविड उपचारासाठी पनवेलकरांची मोठी गैरसोय होत आहे. कोविड उपचाराबाबत माहिती देण्यासाठी पनवेल मनपाने अद्यापि साधी हेल्प लाईन देखील सुरु न केल्याने कोविड उपचारासाठी बेड आणि रेमडीसीवीर इंजेक्शन शोधण्यासाठी कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चारशे ते पाचशे पर्यंत असलेला आकडा बुधवारी ७५९ वर पोहचला होता. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत, मात्र नियोजनातील त्रुटीमुळे पालिकेने केलेल्या मेहनतीवर पाणी पडत आहे. पनवेल महापालिकेने वाढत्या रुग्णांबाबत गंभीर दाखल घेत पालिका क्षेत्रात कोविड सेंटर वाढविण्याची धडपड करीत आहे. पनवेल क्षेत्रात अनेक ठिकाणी खाजगी कोविड सेंटर देखील सुरु आहेत. मात्र, पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूणच कोविड उपचार केंद्र, उपलब्ध असलेले बेड्स, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स, रेमडीसीवीर इंजेक्शनची उपलब्धता याबाबत नागरिकांना महती नाही. याबाबत माहिती उपलब्ध करून कोविड उचारसाठी सुलभता आणण्यासाठी पनवेल मनपाने अद्यापि हेल्प लाईन सुरु केली नाही. पालिकेने कोविड उपचाराबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी हेल्प लाईन नम्बर सुरु केल्यास नागरिकांना आवश्यक माहिती मिळेल , यामुळे नागरिकांमधील भीती संपून उपचारासाठी अचूक ठिकाणी जात येईल. कोविड रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची मुळे होणारी फरफट थांबेल. पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याबाबत तात्काळ दाखल घेऊन कोविड उपचारांबाबत हेल्पलाईन सुरु करावी, अशी मागणी पनवेलकरांनी केली आहे. दरम्यान, पनवेल मनपा लवकरच हेल्पलाईन सुरु करणार असल्याची माहिती पनवेल मनपा जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी यांनी दिली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »