- नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या प्रयत्नांना यश !
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील अतिसंवेदनशील झालेल्या खारघर विभागात आणखी एक खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. खारघर येथील एक ओमकार हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी 100 बेड्सची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ सईद अहमद यांनी दिली.
खारघर सेक्टर 12 येथे सदर हॉस्पिटल असून लवकरच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे डॉ सईद यांनी नमूद केले.
खारघर विभागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या झपाटयाने वाढत असल्याने बेड मिळणे मुश्किल झाले आहे. आपल्या विभागात कोविड हॉस्पिटल सुरू व्हावे, म्हणून स्थानिक नगरसेविका हर्षदा उपाध्याय व युवानेते अमर उपाध्याय प्रयत्नशील होते. अखेर सेक्टर 12 मध्ये कोविड सेंटर सुरू झाल्याने काही प्रमाणात खारघरवासीयांना दिलासा मिळाला आहे. 100 बेड पैकी 60 बेडस नॉर्मल पेशंटची राहणार आहेत. 10 बेडस व्हेंटिलेटर व 30 बेडस आयसीयूसाठी उपलब्ध राहणार आहेत.





