पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक !
कोकण दर्पण ! कोकण LIVE
पुणे : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दशमेश मंगळामुळे गॉडफादर ठरतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विजय निश्चित होईल, असा दावा ज्योतिष अभ्यासक संतोष लवटे महाराज यांनी केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन होईल असे भाकीत लवटे महाराजांनी केले होते. त्यानंतर राज्यात भाजपचा सत्तेतून पायउतार होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणुकीबाबत लवटे महाराजांनी केलेले विधान खरे ठरण्याचा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी व्यक्त केला आहे.
चंद्र राशीं कर्क असून दशमेश मंगळ असल्यामुळे तो वृषभेला असल्याने वडिलांचे राजकीय प्रवासातला लोकप्रियेतेचा वारस ठरला जातो. दशमेश मंगळ आणि मूळ भाग्यतला गुरूंचा होणारा चलिताचा राजयोग हाच निवडणूक यशाची नांदी ठरेलं. दशमेश मंगल आणि चतुर्थेश शुक्र राजयोगकारक लोकप्रियतेचे द्योतक ठरतील. व्ययेश, धनेश, तृतीयेश, षष्ठश, भाग्येश यांची भाग्य स्थानात राजकृपेच्या राहू सोबत झकास बैठक असल्यामुळे नशीब ही दमदार पणे साथ देईल. लग्नेश लग्नात चंद्र तो ही स्वतः दमदार भाग्येश भाग्यताला गुरु सोबत नवपंचम योग करीत असल्याने शनि आणि मंगळाचा दोन मंत्रिपदाचा कारकत्वाचा केंद्रयोग आणि मुळ जन्मकुंडली मध्ये नवं-नवंपंचम योग असल्यामुळे विजयी योग ठरणार आहे, असे लवटे महाराज यांनी नमूद केले आहे.





