Press "Enter" to skip to content

लुंबिनी आरोग्य केंद्राद्वारे महिलांसाठी दरमहा मोफत आरोग्य तपासणी !

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
डॉ. प्रज्ञा डोंगरगावकर यांचा खास उपक्रम !

पनवेल : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त पिपल्स इम्पाॅवरमेंट सोसायटी आणि लुंबिनी आरोग्य केंद्र यांच्या विद्यमाने खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी महिलांसाठी सदर आरोग्य तपासणी उपक्रम दरमहा मोफत राबविला जाणार असल्याची माहिती डॉ. प्रज्ञा डोंगरगावकर यांनी दिली.

डाॅ. प्रज्ञा डोंगरगावकर निष्णात स्त्रीरोगतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य तज्ञ डॉक्टरांचा संघ डॉ. कपिल चावरे, डाॅ. शुभांशु भालाधरे तथा मनक्याचे विकार तज्ञ, डॉ. प्रणिता डोंगरगावकर आदी डॉक्टरांच्या उपस्थिती १४ एप्रिल रोजी सत्याग्रह महाविद्यालय, सुप्पारक भवन, प्लाट न. ५२ , सेक्टर १९ , खारघर, नवी मुंबई येथे सदर शिबिराचा आरंभ झाला. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मोफत महिलांची आरोग्य तपासणी व निदान करण्यात येणार असून आरोग्य तपासणी शिबीरासाठी नोंदणी करण्यासाठी संगिता वाघमारे ८६५२१३५१२७ ,हर्षल शाक्य ८६९३०१५२७९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ प्रज्ञा डोंगरगावकर यांनी केले आहे.

संजना महाडिक.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »