बाबा तुमचे उपकार फक्त एका समाजावरच नाहीत
तर संपूर्ण देशावर आहेत .
असे कुठलेही क्षेत्र नसेल
जिथे तुमचे कर्तुत्व नाही.
आज या देशाला तुमच्या सारख्या
थोर व्यक्तिमत्वाची अत्यंत गरज आहे.
बा भीमा, परत या, उद्धाराया भारत देशा !
आज फक्त एका समाजाकडून
आणि मनाने सुशिक्षीत संस्कारसंपन्न
लोकांकडून तुम्ही पुजले जाता …खंत वाटते,
आज देशातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे करणारे ,
स्वाभिमानाने हक्क मिळवुन देणारे आपण …
पण कित्येक स्त्रियांना याचे भान सुद्धा नाही…
याची सुद्धा खंत वाटते.
पण याने माझ्या बाबांचे कर्तुत्व लपत नाही.
बाबा तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण त्याने हताश न होता परिस्थीतला कसे पालटून टाकायचे आणि ते ही एका दोघां साठी नव्हे तर युगान युगांसाठी करायचे …हे आज प्रत्येक घरातल्या एकाने सुद्धा ठरवलं न तरी परत लयास गेलेली परिस्थिती अनुकूल होईल.
बाबा परत या !
बा भीमा, परत या, उद्धाराया भारत देशा
युगप्रवर्तक, परमपूज्य, महामानव, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
१३० व्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन !!
सौ.नमिता अभिजित लोखंडे
खारघर, नवी मुंबई.





