कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त पिपल्स इम्पाॅवरमेंट सोसायटी आणि राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लुंबिनी आरोग्य केंद्र यांच्या विद्यमाने
खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार 14 एप्रिल,2021 रोजी
सकाळी 11:00 ते सायं 05:00
पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. तरी या मोफत तपासणी शिबीराचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
डाॅ. प्रज्ञा डोंगरगावकर निष्णात स्त्रीरोगतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य तज्ञ डॉक्टरांचा संघ डॉ. कपिल चावरे, डाॅ. शुभांशु भालाधरे तथा मनक्याचे विकार तज्ञ, डॉ. प्रणिता डोंगरगावकर आदी डॉक्टर येणार आहेत.
सत्याग्रह महाविद्यालय, सुप्पारक भवन, प्लाट न. 52, सेक्टर 19, खारघर, नवी मुंबई येथे सदर शिबिर होणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मोफत महिलांची आरोग्य तपासणी व निदान करण्यात आहे. आरोग्य तपासणी शिबीरासाठी नोंदणी करण्यासाठी
संगिता वाघमारे :8652135127,
हर्षल शाक्य : 8693015279 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ प्रज्ञा डोंगरगावकर यांनी केले आहे.





