नवी मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडरक यांच्या जयंती निमित्त खारघर येथील आंभिरा सामाजिक संस्था व स्टार्क एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू, आयुष्य, घटनेवर आधारीत राज्यस्तरीय ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंग वत्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांना सहभागी होता येणार असून प्रत्येक गटातील ३ विजयी स्पर्धकांना राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
राज्यावर यावर्षी सुद्धा कोरोना या महामारीचे सावट असल्यामुळे खारघर येथील आंभिरा सामाजिक संस्था व स्टार्क एज्युकेशन सोसायटीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत राज्यस्तरीय ऑनलाईन व्हिडीओ रेकॉर्डींग वत्तृत्व स्पर्धेचे आयोजन करुन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना मानवंदना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वत्तृत्व स्पर्धा मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये असणार आहे. ही वत्तृत्व स्पर्धा पाच गटात होणार असून पदव्युत्तर गटासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली आजची लोकशाही हा विषय देण्यात आला आहे. तसेच पदवी प्रथम वर्ष ते पदवी वर्ष या गटासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राज्य घटनेतील योगदान, तसेच ९ ते १२ या वयोगटासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणावरील विचार, त्याचप्रमाणे ५ ते ८ वयोगटासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वफ्नातील भारत, तर १ ते ४ या गटासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीचा एक प्रसंग असे विषय देण्यात आले आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया स्पर्धकांना ठरवून दिलेल्या विषयावर ४ ते ५ मिनिटांचा व्हिडीओ तयार करुन १० एप्रिल २०२१ च्या अगोदर पाठविण्याचे आवाहन आंभिरा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे. लहान वयोगटासाठी प्रवेश शुल्क ५० रुपये तर मोठÎा वयोगटासाठी प्रवेश शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटात ३ विजयी स्पर्धक निवडण्यात येणार असून सर्व विजयी स्पर्धकांना येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावरकर यांच्या हस्ते पारितोषीक दिले जाणार असल्याचे डॉ.चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितले. स्पर्धकांना ७४९९५६१४८८ या क्रमांकावर आपला व्हिडीओ पाठविता येणार असून या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी- ९८२२४५१४८८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडरक जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वत्तृत्व स्पर्धा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




