Press "Enter" to skip to content

५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ! राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
नवी मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांच्या पुढाकाराने नवी मुंबईत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नवी मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या काळात देखील सामाजिक बांधिलकीचे भान राखीत ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करीत कोरोनाच्या लढाईत आपला सहभाग नोंदविला.

डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय कोपरखैरणे, सेक्टर २० येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर रक्तदान शिबीर संपन्न झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या झपाट्याने वाढू लागला आहे. रुग्णांवर उपचारासाठी रक्ताची नितांत गरज आहे. मात्र, राज्यात फक्त आठ दिवसच पुरेल एवढा रक्तसाठा आहे. सदर बाब अतिशय गंभीर असून काही दिवसातच रक्त तुटवडा भासू लागणार आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. हि सर्वांचीच सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी , असे आवाहन मल्लिकार्जुन पुजारी यांनी केले होते. युवानेते शिवशरण पुजारी यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी रक्तदान केले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »