कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा भाजप खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्षा बिना जयेश गोगरी यांना हालिमाबाई झुलेवाली ट्रस्टद्वारा `२०२१ रियल सुपर वुमन” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शाश्वत फौंडेशनच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बिना गोगारी व जयेश गोगारी दाम्पत्यांनी सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. बिना गोगारी या सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात अग्रेसर असतात. त्यांच्या या योगदानामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात त्या सर्वपरिचित आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन पनवेलमधील ७५ वर्षे जुनी असलेली सामाजिक संस्था,”हालिमाबाई झुलेवाली ट्रस्ट”ने त्यांना, “२०२१ चा रियल सुपर वुमन” हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. संस्थेचे अध्यक्ष मो.हानिफ कच्च्छी, सलमा कच्च्छी तसेच सामाजिक कार्यकर्ते जयेश गोगरी उपस्थित होते.





