कोकण दर्पण ! कोकण LIVE
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल क्षेत्रातील खाजगी शाळांनी सार्वजनिक मैदाने स्वतःच्या मालकीची समजू नयेत. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त तसेच साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेची मैदाने नागरिकांसाठी खुली करून द्यावीत, असा फतवा सिडको प्रशासनाने काढला आहे. अन्यथा, स्वतःची मनमानी करून नियमांनाचे उल्लंघन करणाऱ्या अशा शाळांवर सक्तीची कारवाई करण्याचा इशारा सिडको प्रशासनाने दिला आहे.
नवी मुंबईतील अनेक शाळा शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. सिडको महामंडळाने शाळांसोबत केलेल्या करारान्वे शाळांना शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करणे बंधनकारक आहे. ज्या शाळा सदर अटींचे उल्लंघन करतील अशा शाळांवर सिडकोतर्फे सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
सिडको महामंडळातर्फे शाळांसोबत केलेल्या करारनाम्यातील अट करांक ३ ड अन्वये शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेचे मैदान सामान्य नागरिकांना वापरायला देणे बंधनकारक आहे. परंतु अनेक शाळा हि अट पाळत नसल्याचे सिडको महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. आपल्या विभागातील शाळा जर खेळाचे मैदान शाळा वेळे व्यतिरिक्त खुले करून देत नसतील तर सीकडीकडे तात्काळ करण्याचे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शाळांनी देखील मैदानाबाबत केलेल्या कराराचे उल्लन्घन नन करता जनतेला उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन शाळांना केले आहे.





