कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पत्नी पुष्पा घरत यांचे काल बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. खारघर येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नवी मुंबईतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
पुष्पा घरत या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना नुकतेच नेरुळ येथील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. उपचार सुरू असताना काल त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती शिरीष घरत, तीन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुष्पा घरत यांचा दशक्रिया विधी येत्या २ एप्रिल रोजी नाशिक येथे होणार असून उत्तरकार्य येत्या ५ एप्रिल रोजी खारघर येथील राहत्या घरी पार पडणार आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पत्नी पुष्पा घरत यांचे निधन !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




