Press "Enter" to skip to content

खारघर भाजपातर्फे राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शने !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : खारघर शहर भाजपच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. खारघरमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी गेला बेरा , सरचिटणीस दीपक शिंदे, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष किरण पाटील, वासुदेव पाटील आदींसह भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दिल्याचा गौप्यस्फोट पत्राद्वारे केल्यानंतर संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. पनवेल भाजपने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खारघरमध्ये भाजपने निदर्शनं करत देशमुखांचा निषेध नोंदवला. ‘महाराष्ट्र सरकारला लुटारुंचं ग्रहण’ असं लिहिलेल्या बॅनरवर अनिल देशमुखांचा फोटो लावून भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, जर स्वतः त्यांनी राजीनामा दिला नाही तर गृहमंत्री पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात यावी यासाठी भाजपतर्फे खारघर येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘महाराष्ट्र सरकारला लुटारुंचं ग्रहण’ असं लिहिलेला बॅनर हाती धरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »