कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पनवेलमधील अनेक वकिलांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अँड. पवनकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सुमारे २० वकिलांचा प्रवेश समारंभ संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त वकील पदाधिकार्यांना मान्यवरांच्या हस्ते पद वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सूरदास गोवारी, पनवेल महिला निरीक्षक भावनाताई घाणेकर, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील , पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शिवदास कांबळे , पनवेल युवक जिल्हाध्यक्ष- प्रमोद बागल , जिल्हा उपाध्यक्ष आजिनाथ सावंत, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव पवार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल, खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके, सरचिटणीस. रणजीत नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष. कासम मुलानी, कामोठे शहर सरचिटणीस शैलेश लोंढे, कामोठे शहराचे युवानेते राहुल यादव, कामोठे युवानेते महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.





