कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपला कोविड १९ लसीकरणाचा दुसरा डोस उपजिल्हा रूग्णालय येथे घेतला.
आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांसाठी सध्या महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरण चालू आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांचा लसीकरणाचा दुसरा टप्पा चालू आहे.





